25 February 2021

News Flash

उस्मानाबाद : भाजपा आमदार सुरजितसिंह ठाकूरांना करोनाची लागण

ठाकूरांच्या परिवारातील सहा सदस्यांचा अहवालही पॉझिटीव्ह

महाराष्ट्रात करोनाचा कहर अजुनही सुरुच असून शहरांसह ग्रामीण भागातही करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुरजितसिंह ठाकूर यांनाही करोनाची लागण झाली आहे. ठाकूर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सहा जणांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आलेला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान सोमवारी जिल्ह्यात आणखी नवे १८३ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या २ हजार ६४४ वर पोहचली आहे. आजच्या दिवसात तिघांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ६७ इतकी झाली आहे.

उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयामार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि उपकेंद्र उस्मानाबाद येथील कोविड चाचणी केंद्राकडे पाठविण्यात आलेल्या ४७५ स्वॅबपैकी ४६९ अहवाल रविवारी रात्री प्राप्त झाले. यातील तब्बल १२७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. २३५ अहवाल निगेटिव्ह आले असून १०५ संदिग्ध असून ६ अद्याप प्रलंबित आहेत. उस्मानाबाद शहर व तालुक्यात २५, कळंब ९६, तुळजापूर २४, उमरगा ४८, परंडा १४, भूम ३८, लोहारा १५, वाशी ७ असे एकुण १८३ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

परंडा शहरातील शहरात आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्यासह कुटुंबातील ६ जणांना लागण झाली आहे. तसेच मंगळवारपेठेसह तालुक्यातील शेलगाव, कंडारी, शिरसाव येथेही रुग्ण आढळले आहेत. भूम शहरातील बस स्थानक, मेन रोड भागासह तालुक्यातील वारेवडगाव, पाथ्रुड, पांढरेवाडी, माणकेश्वर, वाशी शहरातील बस स्थानक परिसर, वाणी गल्ली येथेही रुग्णांचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 8:13 pm

Web Title: bjp mlc from osmanabad surjitsingh thakur found covid 19 positive psd 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्रात ९ हजार १८१ नवे करोना रुग्ण, २९३ मृत्यू
2 …अशा परिस्थितीत केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत; पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना दिला शब्द
3 “एक्स्प्रेस, मेल तसंच लोकल वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार हे वृत्त चुकीचं”
Just Now!
X