नदरूबार येथील भाजापाच्या खासदार डॉ. हिना गावित लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. डॉ. तुषार वळवी यांच्याशी त्या विवाहबद्ध होणार आहेत. हिना गावित यांचा मुंबईमध्ये नुकताच साखरपुडा पार पडला आहे.

नंदूरबार जिल्ह्यातलं हातधुई येथील डॉ. तुषार वळवी व्यावसाय करण्यासाठी मुंबईत स्थायिक झाले आहेत. तुषार वळवी एमडी आहेत.जवळील मित्रमंडळी आणि परिवारातील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत डॉ. हिना गावित आणि डॉ. तुषार वळवी यांचा साखरपुडा पार पडला. लवकरच दोघेही विवाहबद्ध होणार आहेत.

mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
Virat Kohli Dancing on Chiku Chants While Fielding
विराट कोहलीला चिकू हाक मारताच त्यानं फिल्डिंग सोडून केलं असं काही..चाहते झाले थक्क; पाहा Video
South Central Mumbai
दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांत धुसफूस, शिवसेनेकडून प्रचार फेऱ्यांना सुरुवात
Big blow to Sunrisers Hyderabad team in IPL 2024
IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का! ‘हा’ प्रमुख खेळाडू टाचेच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकणार

हिना गावित यांचं MBBS, MD पर्यंत शिक्षण झालं आहे. माजी मंत्री विजय गावित यांच्या त्या कन्या आहेत. २०१४ लोकसभा निवडणुकीआधी गावित यांनी मोदींच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला होता. गावित यांच्या भाजपाप्रवेशामुळे नंदुरबारमधील राजकीय समिकरणं बदलली आहेत. हिना गावित यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवताना काँग्रसचे नऊ वेळा खासदार राहिलेले ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचा पराभव केला होता. २०१९ च्या निवडणूकीत पुन्हा एकदा विजयी होत हिना गावित दुसऱ्यांदा खासदार झाल्या आहेत.