News Flash

मराठा आरक्षण आंदोलनात भाजप सहभागी होणार

मराठा समाजाचा प्रक्षोभ शांत करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव हाणून पाडला जाईल

(संग्रहित छायाचित्र)

आमदार संभाजी पाटील यांची माहिती

लातूर : मराठा आरक्षणासाठीच्या कायदेशीर लढाईत महाविकास आघाडी सरकारने कच खाल्ली असल्याने आता आरक्षण मिळवण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील त्यात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख बाजूला ठेवून आंदोलनात सहभागी होईल, अशी ग्वाही पक्षाचे नेते, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी एका निवेदनाद्वारे दिली.

मराठा समाजाचा प्रक्षोभ शांत करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव हाणून पाडला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा भाजपचा निर्धार आहे, असेही आमदार निलंगेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 12:28 am

Web Title: bjp will participate in maratha reservation movement akp 94
Next Stories
1 Congress Toolkit : काँग्रेसकडून प्रत्येक वेळी भारतविरोधी भूमिका का घेतली जाते? – देवेंद्र फडणवीस
2 चक्रीवादळाच्या तडाख्याने कोकणातील हापूसचा हंगाम संपुष्टात
3 Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात ५२,८९८ रुग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट ९०.६९ टक्क्यांवर!
Just Now!
X