News Flash

“भारतनाना माफ करा…. सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली”

"नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरवलं"

(स्व. भारत भालके यांचं संग्रहित छायाचित्र)

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला दणका दिला. भाजपाच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांचा ३७३३ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी काल पार पडली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आघाडी विरोधात भाजपा अशी प्रतिष्ठेच्या झालेल्या या लढतीत भाजपाने बाजी मारली. मात्र, ही निवडणूक भाजपाने पैशाच्या जीवावर जिंकली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

पैसा व सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती या निवडणुकीत जिंकली, अशी टीका मिटकरी यांनी केली आहे. “भारतनाना माफ करा तुम्ही केलेली सेवा भक्त पुंडलिकरुपी असली तरी तुमच्या सेवेपेक्षा मसल आणि मनीपॉवर वापरून भाजपाने लढवलेली ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती. पैसा व सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले”, असं ट्विट करत मिटकरी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.


राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात ही पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीने भालके यांचा मुलगा भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली, तर भाजपने आवताडे यांना संधी दिली. पहिल्या फेरीपासून आवताडे यांनी आघाडी घेतली होती. सुरुवातीस ही आघाडी थोड्या मतांची असल्याने ही लढत अटीतटीची होणार असे वाटले. मात्र पुढील प्रत्येक फेरीत आपली आघाडी वाढवत नेत आवताडे यांनी अखेर ३७३३ मताधिक्क्याने विजय संपादन केला. आवताडे यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. भारत भालके यांच्या निधनामुळे होत असलेल्या या निवडणुकीत भगीरथ भालके यांच्यासाठी भावनिक मुद्दा हा जमेचा होता. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 8:44 am

Web Title: bjp win in padharpur mangalvedha assembly bypoll due to money and muscle power says ncp amol mitkari sas 89
Next Stories
1 “नैतिक जबाबदारी कोणी घ्यायची ते मोदी-शाह-नड्डांनी ठरवायला हवं”
2 नंदुरबार जिल्ह्याचा आरोग्य स्वयंपूर्णत्वाचा आदर्श
3 अमरावती जिल्ह्य़ातील १०६ गावांमध्ये प्रवेशबंदी
Just Now!
X