शरद पवार यांच्या विरोधात माढा मतदार संघात लढण्यासाठी तगडा उमेदवार सध्या तरी भाजपकडे नसल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना पुन्हा तिकीट देण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नाव बाजूला सारत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार २०१९ ची निवडणूक माढ्यातून लढवणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार विरूद्ध सुभाष देशमूख असा सामना पहायाला मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२००४ च्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वलाताई शिंदे यांचा सुभाष देशमुख यांनी पराभव केला होता. त्यानंतर २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना माढा मतदार संघातून शरद पवार यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली. मात्र, शरद पवार यांच्यासमोर त्यांना मोठ्या पराभवला सामोरं जावं लागले होते. त्याचे राजकीय आणि इतर फटके त्यांना अद्यापही सहन करावे लागत आहेत.

२०१४ मध्ये भाजपाने मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेला माढा मतदार संघ दिला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून येथून सदाभाऊ खोत यांनी दंड थोपाटले होते. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून परभवाचा सामना करावा लागला होता. राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते-पाटील यांनी ४,८९,९८९ मते विळवत विजयी पताका फडकावली होती. तर सदाभाऊ खेत ४,६४,६४५ मतांसह दुसऱ्या स्थानावर होते. आता माढा मतदार संघातून पुन्हा एकदा शरद पवार रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे सुभाष देषमुख कशी रणरिती आखतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjps efforts to lose sharad pawar in loksabha2019
First published on: 23-02-2019 at 05:54 IST