प्रियांका व महािलग या दृष्टिहीन जोडप्याचा विवाह मिरजकर तिकटी येथील हिंदू एकता हॉलमध्ये सोमवारी हजारोंच्या साक्षीने मोठय़ा थाटात सोमवारी संपन्न झाला. दोघेही जरी दृष्टिहीन असले तरी समाजाने मात्र त्यांना जगण्याचे सामर्थ्य दिले आहे. सामाजिक कार्यकत्रे सदाशिव शेटे यांनी कन्यादान केले, तर अंध युवक मंचने विवाहाचे आयोजन केले.    
इचलकरंजीचा महािलग याचे शिक्षण दहावी झाले असून सध्या तो गोकुळ शिरगाव येथील कमला प्लॅस्टिक कंपनीत काम करतो. सोलापूरच्या प्रियांकाचेही शिक्षण दहावी झाले असून ती लहान मुलांची खेळणी, साहित्य, पापड, लोणचे आदी वस्तू विकण्याचे काम करते. महािलग लहानपणीच पोरका झाल्याने येथील अंध युवक मंचने त्याचा सांभाळ केला. तर प्रियांकाही आईला पोरकी झाली आहे. तिचे वडील मोलमजुरी करतात. अशा या दृष्टिहीन जोडप्याला अंध युवक मंच व समाजाने जगण्याचे एक नवे जीवन दिले आहे.
नाना-नानी पार्कचे अध्यक्ष डॉ. दिलीप शहा हे वधूसाठी मणिमंगळसूत्र, रायिझग स्टार फाऊंडेशनच्या अध्यक्ष मंजिरी चिपळूणकर यांनी भांडी, तर सियाराम शॉपीचे रोहित वासदाणी यांनी वराला सफारीचे कापड दिले आहे. आर. एस. पाटील यांनी वधूला शालू दिला आहे. यांच्यासह व्ही. बी. देशिंगकर, उद्योगपती बाळासाहेब काडोलकर, उद्योगपती डॉ. जयसिंगराव कदम, श्याम जोशी, राजू मेवेकरी, फिरोज बागवान, नजिर देसाई, किशोर घाडगे, आदींसह अनेक लोकांनी या नव वधू-वरांना आíथक मदत केली आहे.