News Flash

प्रेयसी बोलत नाही म्हणून प्रियकराने घरात घुसून केले वार, पुण्यातील धक्कादायक घटना

प्रेयसी बोलत नाही म्हणून नाराज झालेल्या प्रियकराने प्रेयसीच्या घरात जाऊन तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. पिंपरी-चिंचवडच्या भोसरी मध्ये मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना

प्रातिनिधिक छायाचित्र

प्रेयसी बोलत नाही म्हणून नाराज झालेल्या प्रियकराने प्रेयसीच्या घरात जाऊन तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. पिंपरी-चिंचवडच्या भोसरी मध्ये मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

शाहरुख शेख (२२) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या एक वर्षापासून अल्पवयीन मुलगी आणि शाहरुख शेख यांच्यात प्रेम संबंध होते. शाहरुख त्याच्या १७ वर्षीय अल्पवयीन प्रेयसीला जबरदस्तीने लॉजवर घेऊन गेला व तिथे जाऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला. पुन्हा तो तसाच प्रकार करण्याचा प्रयत्न करत होता.

परंतु अल्पवयीन मुलीला हे मान्य नव्हते म्हणून तिने प्रियकराचा फोन उचलला नाही, त्याच्याशी बोलणे टाळले. शाहरुख तिला बोलण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न करत होता. तो तिला भेटायला बोलवत होता. पण ती मुलगी शाहरुखबरोबर बोलायला टाळाटाळ करत होती. याचा राग मनात धरून शाहरुख मंगळवारी रात्री तिच्या घरी गेला आणि तिच्या गळ्यावर वार केले. यावेळी घरात आई-वडील होते परंतु शाहरुखच्या हातात धारदार शस्त्र असल्याने कोणीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. याप्रकरणी आरोपी शाहरुखला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 2:12 pm

Web Title: boyfriend attack on girlfriend in pune
Next Stories
1 मुलीच्या मैत्रिणीवर वडिलांचा अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना
2 म्हाडाकडून राज्यभरात तीन हजार घरांसाठी सोडत
3 बोगस ठरवण्याची प्रक्रियाच सदोष
Just Now!
X