लाचखोरीच्या प्रकरणात यापूर्वी अटक झालेल्या गिरीशकुमार पारीख याच्याकडे तब्बल नऊ कोटी ९३ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. रायगड पोलिसांच्या लाचलुचपत विभागाने त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून, अलिबागच्या विशेष सत्र न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता असलेला गिरीशकुमार याने एका हॉटेल मालकाकडून जाहिरातीचा फलक लावण्यासाठी २५ हजारांची लाच मागितली होती.