13 August 2020

News Flash

बायको देता का बायको चित्रपटाच्या अभिनेता आणि दिग्दर्शकास बेदम मारहाण

चित्रपट गृहासमोरच अज्ञात तरुणांकडून जीवघेणा हल्ला केला

प्रतिनिधिक छायाचित्र

बायको देता का बायको!’ या मराठी सिनेमाचा अभिनेता, दिग्दर्शकावर अज्ञात तरुणांनी अचानक जीवघेणा हल्ला केला. दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत अभिनेता सुरेश ठाणगे व दिग्दर्शक धनंजय यमपुरे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बीड येथील आशा सिनेफ्लेक्सच्या आवारात शनिवारी सायंकाळी ६ वाजता ही घटना घडली. अभिनेत्री श्वेता कुलकर्णी हिने प्रसंगावधान राखल्याने ती थोडक्याच बचावली.

बीड येथील आशा सिनेफ्लेक्स चित्रपट गृहात ‘बायको देता का बायको!’ सिनेमाचा शो सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांसोबत धम्माल करण्यासाठी सिनेमाचे अभिनेता, अभिनेत्री आणि दिग्दर्शक आले होते. या दरम्यान, सिनेमागृहाच्या आवारात अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यामध्ये चित्रपट अभिनेते सुरेश ठाणगे व निर्माते धनंजय यमपुरे गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी अभिनेत्री श्वेता कुलकर्णी हिने बचावासाठी तेथून पळ काढल्याने ती थोडक्यात बचावली. हल्लेखोरांनी आशा सिनेफ्लेक्सच्या आवारात फर्निचरची तोडफोडही केली, मारहाण कारणारे कोण होते याचा शोध घेतला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 10:03 pm

Web Title: brutal beating of actor and director in beed abn 97
Next Stories
1 “काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेनेच्या विचारात कोणती प्रेरणा मिळाली कळत नाही”
2 …..तर फडणवीस यांनाही ‘देवेंद्रभाऊ’ म्हणेन-रोहित पवार
3 वर्ध्याच्या जवानाचा मृत्यू, अखेरची इच्छा होणार पुर्ण
Just Now!
X