News Flash

कर्ज फिटल्यानंतरही मिळकतीवरील बोजा कायम

बँके कडून कर्ज घेताना तारण म्हणून ठेवलेल्या मिळकतीवरील कर्ज फिटल्यानंतरही संबंधित मिळकतीवरील बोजा कायम राहत आहे.

कर्ज फिटल्यानंतरही मिळकतीवरील बोजा कायम
प्रतिनिधिक छायाचित्र

ऑनलाइन शोध घेताना अडचणी

पुणे : बँके कडून कर्ज घेताना तारण म्हणून ठेवलेल्या मिळकतीवरील कर्ज फिटल्यानंतरही संबंधित मिळकतीवरील बोजा कायम राहत आहे. कर्ज फेडल्यानंतर प्रत्यंतरण पत्र (रिक्न्व्हेअन्स डीड) नोंदवण्याची सुविधा नसल्याने नागरिक तसेच वकिलांना संबंधित मिळकतीचा ऑनलाइन शोध (सर्च) घेताना परिपूर्ण माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे नागरिकांना मिळकती विकताना अडचणी येत आहेत. या त्रुटी दूर करण्यासाठी प्रत्यंतरण पत्र बँके च्या वतीने नोंदणी विभागाच्या संके तस्थळावर अपलोड करण्याची सुविधा सुरू होणे आवश्यक असली तरी मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागाकडून तशी सुविधा उपलब्ध झालेली नाही.

कर्ज घेताना सदनिका, भूखंड किं वा शेतजमिनीची कागदपत्रे बँके त जमा के ल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयात वकील बँके च्या सुचनेनुसार नोटिस ऑफ इंटिमेशनसोबत हक्कविलेख-निक्षेपचा (इक्विटेबल मॉर्गेज) दस्त जोडतात. त्यामुळे संबंधित मिळकतीवर बोजा निर्माण झालेला असतो. मात्र, संबंधित कर्ज फे डल्यानंतर प्रत्यंतरण पत्र नोंदवण्याची तरतूद नसल्याने नागरिकांना तसेच वकिलांना संबंधित मिळकतीचा ऑनलाइन शोध (सर्च) घेताना परिपूर्ण माहिती उपलब्ध होत नाही.

याबाबत अवधूत लॉ फाउंडेशनचे मार्गदर्शक श्रीकांत जोशी म्हणाले, प्रत्यंतरण पत्र नोंदवण्याची सुविधा नसल्याने मिळकतीचा शोध घेताना अडचण येतेच. याशिवाय मिळकतीची पूर्ण विक्री करताना संबंधित मिळकतीचे कर्ज फे डलेले असतानाही, त्यावर बोजा दिसून येतो. त्यामुळे संबंधित मिळकतीबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण होते.

या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी प्रत्यंतरण पत्र बँके च्या वतीने नोंदणी विभागाच्या संके तस्थळावर अपलोड करण्याचे निर्देश देणे आवश्यक आहे. हे पत्र मालकी हक्क विलेख निक्षेपित करून दिलेल्या गहाणखताच्या सुचनेलगत निदर्शनास आले पाहिजे, अशी मागणी अवधूत लॉ फाउंडेशनचे अध्यक्ष चंदन फरताळे आणि  यांनी के ली आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची यंत्रणा अद्ययावत करण्याचे काम सध्या सुरू आहे. सद्य:स्थितीत येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्याचे प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहेत. आंतरजाल सेवा खंडित झाल्यानंतरही दस्त नोंदणीसह विभागाच्या इतर सेवा बंद पडू नयेत या बरोबरच सव्‍‌र्हर डाउन आणि अशा विविध समस्यांसह प्रत्यंतरण पत्राबाबतची समस्याही दूर होईल.

– श्रावण हर्डीकर, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2021 12:04 am

Web Title: burden on the property remains same even after the loan has been paid zws 70
Next Stories
1 करोनाकाळातही विक्रमी वीजजोडण्या
2 हिंगोलीत वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह सापडले
3 परळीमध्ये करुणा शर्मांच्या वाहनात आढळले पिस्तूल!
Just Now!
X