News Flash

वाशीममध्ये आमदार पडळकरांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध

लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या विषया भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद वाशीममध्ये उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या नेतृत्वात घोषणाबाजी करून पडळकरांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

शरद पवार यांच्या विषयी विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त विधान केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ठिकठिकाणी तीव्र निषेध केला जात आहे. राष्ट्रवादीचे वाशीम जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या नेतृत्वात आज शहरातील अकोला नाका येथील मुख्य चौकात गोपीचंद पडळकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 8:50 pm

Web Title: burning of a symbolic statue of mla padalkar in washim scj 81
Next Stories
1 हातभट्टीचा अड्डा उध्वस्त करणाऱ्या पोलिसांवर सशस्त्र हल्ला
2 विद्युतवाहिनी सर्वेक्षणासाठी ड्रोनच्या सहायाने आधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती
3 महाराष्ट्राने पुन्हा करुन दाखवलं, बरे झालेल्या रुग्णांची विक्रमी संख्या; ४१६१ रुग्णांना सोडले घरी
Just Now!
X