11 August 2020

News Flash

चंद्रपुरात पारा ४५.६वर

राज्याच्या बहुतांश भागात तापमानात वाढ झाली असून विदर्भात चंद्रपूर, नागपूर, वर्धा, ब्रह्मपुरी येथे पारा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे.

| May 25, 2014 05:36 am

राज्याच्या बहुतांश भागात तापमानात वाढ झाली असून विदर्भात चंद्रपूर, नागपूर, वर्धा, ब्रह्मपुरी येथे पारा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. त्या भागाला उष्णतेच्या तीव्र लाटेने हैराण केले आहे. मराठवाडय़ातही पारा बेचाळिसीपार गेला आहे. आणखी दोन दिवस उकाडा असाच राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
काही शहरांत शनिवारी नोंदलेले तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअसमध्ये) : नगर ४१.५, सोलापूर ४३.४, मालेगाव ४१.९, जळगाव ४३.५, उस्मानाबाद ४२.३, औरंगाबाद ४०.९, परभणी ४३.४, नांदेड ४३, बीड ४२.८, अलिबाग ३२.६, रत्नागिरी ३३.४, भीरा ४०.५.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2014 5:36 am

Web Title: chandrapur temperature reaches 45 6 c
Next Stories
1 चड्डी-बनियन टोळीचा फैजपुरात धुमाकूळ
2 साईश्रद्धा मार्केटिंगच्या माध्यमातून फसवणूक
3 पावणेतीन कोटीचे अमली पदार्थ जप्त
Just Now!
X