X
X

नाशिकमध्ये पुन्हा एकदा छगन भुज’बळ’, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

READ IN APP

तुरुंगातून सुटल्यानंतर छगन भुजबळ पहिल्यांदाच नाशिकला आले असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाशिकमध्ये दाखल झाले असून कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी तुफान गर्दी केली आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर छगन भुजबळ पहिल्यांदाच नाशिकला आले असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवत, फटाके फोडून छगन भुजबळांचं जंगी स्वागत केलं आहे. छगन भुजबळ यांच्यासोबत समीर भुजबळदेखील नाशिकमध्ये पोहोचले आहेत.

छगन भुजबळ आणि समीर भुजबळ तब्बल अडीच वर्षानंतर नाशिकमध्ये आले असून,त्यांच्या स्वागतासाठी आधीपासूनच कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होती. शहरभरात भुजबळांच्या स्वागतासाठी होर्डिंग्ज लावण्यात आले असून ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत.

छगन भुजबळ नाशिक दौऱ्यात कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत. राष्ट्रवादी भवनच्या केबिनमध्ये ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. यावेळी छगन भुजबळ येवला मतदारसंघातील लोकांच्या भेटीगाठी देखील घेणार आहेत.

21
X