शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस

पंढरपूर : सोलापूर, पंढरपूरसह अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि वारे वाहत होते. मात्र शनिवारी रात्री पंढरपुरात वादळी वाऱ्यासह पावसाने चांगली हजेरी लावली. तसेच सोलापूर शहरात देखील सोसाटय़ाचा वारा आणि पावसाने चांगलेच झोडपून काढले. शहरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची घटना झाली. मात्र आधी पाऊस आणि नंतर ढगाळ वातावरण यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.

Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
Stormy rains damage mango orchards in Trimbakeshwar taluka
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वादळी पावसामुळे आंबा बागांचे नुकसान
worth rupees 15 lakh Gutkha tranceport revealed during inspection on Kolhapur road
कोल्हापूर रोडवर तपासणीत १५ लाखाची गुटखा वाहतूक उघड
Mild earthquake tremors in Akola district
अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे

हवामान खात्याने दिलेल्या अंदानुसार सोलापूर शहराला शनिवारी पावसाने चांगलेच झोडपून काढले. गेले काही दिवस उकाडय़ाने हैराण झालेल्या सोलापुरकरांना थोडासा दिलास मिळाला. सुरुवातीला सोसाटय़ाचा वारा सुटला आणि त्यानंतर पावसाने हजेरी लावली. पावसाच जोर आणि वारा यामुळे शहरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र वीज वितरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने वीज पुरवठा सुरळीत केला. तर दुसरीकडे ग्रामीण भागात पाऊस पडल्याची माहिती आहे.

पंढरपुरात शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास सुरुवातीला वारे आणि त्यानंतर पावसाला सुरुवात झाली.

तालुक्यात सरासरी १८ मि.मी पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक तुंगत येथे ३२ करकंब येथे ३० मि.मी तर भाळवणी २५ आणि पंढरपूर येथे १६ मि.मी पावसाची नोंद झाली. दिवसभर उन्हाचा तडाखा वाढत होता. सुमारे दीड तास पावासाने वातावरणात बदल होऊन गारवा जाणवू लागला. दरम्यान, रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तसेच वारे देखील वाहत होते. असे असले तरी या अवकाळी पावसाने वातावरणात बदल झाला आहे. मात्र फळ बागायतदारांना याचा फटका बसला आहे.