केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राज्यात शेवटी कटोरा घेऊन फिरावं लागेल अशी टीका उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. अशात मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही ऑपरेशन कमळ राबवलं जाणार अशी चर्चा रंगली आहे. त्याबाबत नितीन राऊत यांना विचारलं असता दिल्लीत गेलेल्या फडणवीसांना महाराष्ट्रात कटोरा घेऊन फिरावं लागेल अशी टीका केली आहे.

राजस्थानात जे काही घडलं त्यानंतर महाराष्ट्रातही ऑपरेशन कमळची चर्चा रंगली त्याबाबत नितीन राऊत यांना विचारलं असता फडणवीसांना राज्यात कटोरा घेऊन फिरावं लागेल अशी टीका नितीन राऊत यांनी केली आहे. आज नागपूर शहर आणि ग्रामीण कायदा सुव्यवस्था येथील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखही हजर होते. उर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊतही हजर होते. त्यानंतर त्यांना ऑपरेशन लोटसबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी फडणवीसांवर सडकून टीका केली.

महाराष्ट्राचं सरकार चांगल्या स्थितीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्यांनी करोनाची परिस्थितीही अत्यंत संयमीपणे हाताळली आहे. आमचे आमदार खुश आहेत. त्यामुळे पाच वर्षे या सरकारला काहीही धोका नाही. त्यामुळे फडणवीसांना महाराष्ट्रात कटोरा घेऊन फिरावं लागेल अशा तिखट शब्दात नितीन राऊत यांनी टीका केली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्यासोबतची भेट ही राजकीय नव्हती. महाराष्ट्राचं सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही तीन पक्षांमधल्या अंतर्विरोधाने हे सरकार आपोआप पडेल. ज्यावेळी सरकार पडेल तेव्हा काय करायचं ते पाहू असं शुक्रवारीच स्पष्ट केलं आहे.