मुंबई : राज्यातील कॉंग्रेस उमेदवारांच्या नावांवर नवी दिल्लीत झालेल्या छाननी समितीच्या बठकीत चर्चा करण्यात आली. एकमत झालेल्या नावांची केंद्रीय समितीला शिफारस करण्यात आली.

राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, संघटन सरचिटणीस वेणूगोपाळ यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. प्रदेश कॉॅग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील उपस्थित होते. सुशीलकुमार शिंदे (सोलापूर), मुकूल वासनिक (रामटेक), खासदार राजीव सातव (हिंगोली), अमिता अशोक चव्हाण (नांदेड), चारुलता टोकस (वर्धा) आदी नावांची एकमताने शिफारस करण्यात आली आहे. या नावांची केंद्रीय समितीला शिफारस करण्यात आली. धुळ्यातून रोहिदास पाटील यांची शिफारस करण्यात आली. अन्य मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. मुंबईत संजय निरुपम, कृपाशंकर सिंग यांच्यातील वादाने मुंबईबाबत चर्चा नंतर करण्यात येणार आहे.

नगरबाबत शरद पवारांशी चर्चा

नगरच्या जागेवरून तिढा निर्माण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर काॅँग्रेसचे केंद्रीय नेते राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत.