News Flash

काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी घेतली गडकरींची भेट, विकासकामांबाबत चर्चा

विकास कामांविषयी चर्चा करण्यासाठी भेट घेतल्याचे सातव यांचे स्पष्टीकरण

गडकरी यांचे विरोधी पक्षातील नेत्यांशीही चांगले संबंध आहेत.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय राजीव सातव यांनी शनिवारी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. मतदारसंघातील विकास कामांसाठी ही भेट घेतल्याचे सातव यांचे म्हणणे आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊनच गडकरींच्या भेटीला गेलो होतो असे सातव यांनी नमूद केले.

हिंगोलीतील काँग्रेस खासदार राजीव सातव शनिवारी दुपारी नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचले. राजीव सातव हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. माझ्या मतदार संघातील प्रलंबित विकासकामांसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन गडकरींच्या भेटीला गेलो असे राजीव सातव यांनी सांगितले. अकोला- नांदेड राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने मार्गी लावणे, तसेच राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादनाच्या प्रश्नावरही गडकरींशी चर्चा केली असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 6:23 pm

Web Title: congress mp from hingoli rajeev satav close aide of vice president rahul gandhi meet bjp nitin gadkari in nagpur
टॅग : Nitin Gadkari
Next Stories
1 औरंगाबादमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या चौघांना गाडीने उडवले
2 उजनी, वीरच्या विसर्गामुळे चंद्रभागेला पूर
3 निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा नांदेड विरुद्ध लातूर वादाला फोडणी!
Just Now!
X