23 January 2021

News Flash

महाराष्ट्रात खासगी प्रवासी वाहतूक १०० टक्के क्षमतेने चालवण्यास संमती

महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्रात खासगी बसमधून १०० टक्के प्रवासी आणि पर्यटक वाहतुकीला संमती देण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय होताच परिवहन आयुक्तालयाने बससाठी मानक कार्यपद्धतीही जाहीर केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणं हे खासगी वाहतुकीसाठी सक्तीचं असणार आहे. महाराष्ट्र मोटर वाहन नियम १९८९ च्या नियम २० (१) मधील तरतुदीनुसार वाहनाच्या प्रत्येक चालकाने वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणं बंधनकारक आहे. त्यानुसार कंत्राटी बसच्या चालकाने त्यातून प्रवास करणारा पर्यटक किंवा प्रवासी गट बदलताना तसेच प्रवासाच्या प्रत्येक दिवशी प्रत्येक फेरी अंती प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे.

आणखी काय आहेत नियम?
बसचे आरक्षण कक्ष/कार्यालय, चौकशी कक्ष यांचीही वेळोवेळी स्वच्छता करावी. तसंच या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणं, सॅनेटायझर वापरणं आवश्यक, बस उभ्या राहतात त्या ठिकाणी गर्दी न होऊ देण्याची काळजी घेणं आवश्यक

बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल गन द्वारे तपासणी करण्यात यावी. एखाद्या व्यक्तीस ताप, सर्दी-खोकला इत्यादी कोविडची लक्षणं दिसत असल्यास त्या प्रवाशास बसमधून प्रवास करण्यास प्रतिबंध करावा

सर्व प्रकारच्या खासगी, कंत्राटी बस वाहनांमधून १०० टक्के क्षमतेने वाहतुकीस संमती

चालकाने प्रवासादरम्यान जेवण, अल्पोपहार, प्रसाधन गृहाचा वापर यासाठी बस थांबवल्यास त्या थांब्यावरीरल ही सर्व ठिकाणे स्वच्छ असल्याची खातरजमा करावी

बससमध्ये चढताना आणि उतरताना तसेच खानपान व प्रसाधनगृहाच्या वापरासाठी उतरताना प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक

प्रवाशांनी बसमध्ये कोणताही कचरा फेकू नये, कचरा फेकण्यासाठी कचराकुंडीचाच वापर करावा

बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मास्क बंधनकारक, सॅनेटायझरही सक्तीचे

करोना वाहतूक नियमावलीचं पालन करणं आवश्यक

या सगळ्या नियम आणि अटींसह १०० टक्के प्रवासी क्षमतेने खासगी वाहतुकीस संमती देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2020 10:22 pm

Web Title: consent to private passenger transport in maharashtra at full capacity scj 81
Next Stories
1 महाराष्ट्रात दिवसभरात ११ हजार ६० रुग्ण बरे, रिकव्हरी रेट ९१ टक्क्यांवर
2 मराठा आरक्षणावर तोडगा काढा, अशोक चव्हाण यांची दिल्लीतील वकिलांशी चर्चा
3 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांची यादी कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द; १२ जणांचा आहे समावेश
Just Now!
X