01 March 2021

News Flash

रायगड जिल्ह्यात करोनाची व्याप्ती वाढली; ६३ नवे रुग्ण सापडले

दिवसभरात ५६ जणांची करोनावर मात

प्रतिनिधिक छायाचित्र

रायगड जिल्ह्यात करोनाची व्याप्ती वाढली आहे. गेल्या चोवीस तासात ६३ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ५६ जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा १,८५३ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात ६३ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील ४४, पनवेल ग्रामिण मधील ७, उरणमधील १, पेण ६, अलिबाग ३, माणगावमधील २ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीतील ३, तर कर्जतमधील एका रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात ५६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील ५,५५४ जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील ३,६१९ जणांचे अहवाल नकारात्मक आले. १,८५३ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर ८२ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. १,३४५ जणांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात सध्या ४२६ करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील २६२, पनवेल ग्रामिण हद्दीतील ७१, उरणमधील १५,  खालापूर ३, कर्जत १५, पेण १३, अलिबाग १३,  मुरुड ४, माणगाव ७, रोहा १, म्हसळा ११, महाड ११ करोना बाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ८२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेले ४२ हजार ११२ जणांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 9:18 pm

Web Title: corona coverage increased in raigad district found 63 new patients of corona aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सोलापूर : दारू पिण्याच्या परवान्यांसाठी सत्ताधारी भाजपाच्या नगरसेविकेचाच पुढाकार
2 मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 चा प्रारंभ १६ हजार कोटींचे गुंतवणूक करार
3 अकोल्यात करोनामुळे आणखी दोन बळी, रुग्णसंख्या १०४१
Just Now!
X