राज्यात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या नवीन करोनाबाधितांबरोबरच मृत्यूंच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषद घेऊन, रूग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर, काही शहरांमध्ये लॉकडाउन सुरू करावं लागेल, असा सूचक इशारा देखील दिला आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात २४ हजार ६४५ नवीन करोनाबाधित आढळले असून, ५८ रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झालेली आहे.  सध्या राज्यातील मृत्यू दर २.१३ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण २,१५,२४१  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

याशिवाय आज १९  हजार ४६३ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत.  राज्यात आजपर्यंत एकूण २२,३४,३३०  करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८९.२२  टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८४,६२,०३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २५,०४,३२७ (१३.५६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,६३,०७७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ११,०९२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Coronavirus – राज्यात तीन महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न – आरोग्यमंत्री

राज्यात करोना संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळत आहे.  या पार्श्वभूमीवर आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना राज्यातील करोना परिस्थती व लसीकरण कार्यक्रमाबाबत माहिती दिली. सध्या दररोज तीन लाख लोकांचं लसीकरण केलं जात आहे, तीन महिन्यात लसीकरण कार्यक्रम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असं आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितलं.