News Flash

COVID-19 : राज्यात आज ९ हजार ४३ रूग्ण करोनामुक्त, तर ८ हजार ४७० नवे करोनाबाधित

दिवसभरात १८८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद

राज्यात आज रोजी एकूण ९३,४७९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत..(संग्रहीत छायाचित्र)

राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. शिवाय दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत मागील बऱ्याच दिवसांपासून करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आढळून येत आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. दिवसभरात राज्यात ९ हजार ४३ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ८ हजार ४७० नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, आज राज्यात १८८ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५७,४२,२५८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.९ टक्के एवढे झाले आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९८,८६,५५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,८७,५२१ (१५.०१टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,५८,८६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,१९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,२३,३४० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. राज्यात आज एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाधान व्यक्त करतानाच त्यांचे अभिनंदन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 8:57 pm

Web Title: covid 19 9 thousand 43 patients recovered from corona in the state today while 8 thousand 470 new corona affected msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्रातील करोनामुक्त गावांमध्ये दहावी आणि बारावीचे वर्ग पुन्हा सुरू होणार?
2 “मोदींना त्यांच्या पुतण्याला उपमुख्यमंत्री करायचं नाहीये”, मुनगंटीवारांचा शरद पवारांवर निशाणा!
3 नाट्यनिर्मिती संस्थांचे अनुदान तातडीने वितरीत करा; उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
Just Now!
X