News Flash

मुंबईसह राज्यात मोठी रुग्णघट

राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्याही दीड लाखाच्या खाली आली आहे.

corona-test
संग्रहित छायाचित्र)

तीन महिन्यांतील सर्वात कमी रुग्णनोंद

मुंबई : करोनाची दुसरी लाट वेगाने ओसरत असून, सोमवारी मुंबईसह राज्यात मोठी रुग्णघट नोंदविण्यात आली. राज्यात सोमवारी ८ हजार १२९ रुग्ण आढळले. त्यात मुंबईतील ५२९ रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येने तीन महिन्यांतील नीचांक नोंदवला आहे. दिवसभरात १४ हजार ७३२ रुग्ण करोनामुक्त झाले. गेल्या २४ तासांत २०० रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्याही दीड लाखाच्या खाली आली आहे. राज्यात कोल्हापूर जिल्ह्य़ात सर्वाधिक ११३१ रुग्णांची नोंद झाली. सांगलीत ६६६, पुणे ग्रामीण ४६०, रत्नागिरी ६५७, साताऱ्यात ५९९ तर मुंबईत ५२९, पुण्यात ४६० नव्या बाधितांची नोंद झाली.

देशात ७०,४२१ नवे करोनाबाधित

’देशभरात गेल्या २४ तासांत करोनाचे ७०,४२१ रुग्ण आढळले. गेल्या ७४ दिवसांतील ही सर्वात कमी दैनंदिन रुग्णवाढ आहे. देशात दिवसभरात ३९२१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

’करोनाबळींची एकूण संख्या ३,७४,३०५ वर पोहोचली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या दहा लाखांखाली आहे. देशभरात सध्या ९,७३,१५८ जणांवर उपचार सुरू आहेत.

’एकूण करोनाबाधितांच्या तुलनेत हे प्रमाण ३.३० टक्के आहे; तर बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढून ९५.३३ टक्के झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2021 3:17 am

Web Title: covid 19 pandemic in maharashtra 8129 covid patients found in the maharashtra zws 70
Next Stories
1 मोसमी वारे सक्रिय, पण पाऊस गायब!
2 लसीकरणातील गोंधळावरून थोरात—विखे समर्थकांमध्ये जुंपली
3 भाडय़ाच्या घरांना व्यावसायिक कर आकारणी
Just Now!
X