सांगलीत रिव्हॉल्व्हरची तस्करी केल्याप्रकरणी सच्या टारझन ऊर्फ सचिन जाधवला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश गुरुवारी न्यायालयाने दिले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बुधवारी त्याला कराड पोलिसांकडून ताब्यात घेतले होते.
सच्या टारझनच्या टोळीतील तिघा तरुणांना गेल्या सप्ताहात सांगली पोलिसांनी अटक करून पाच रिव्हॉल्व्हर हस्तगत केली होती. आचारी काम करणा-या तरुणाला पिस्तूलचा धाक दाखवून लुटल्याबद्दल या टोळीला अटक करण्यात आली होती. या टोळीचा म्होरक्या म्हणून सच्या टारझनला पोलिसांनी कराड पोलिसांकडून ताब्यात घेतले. गुरुवारी पोलिसांनी सच्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.