News Flash

Cyclone Tauktae: देवगडमध्ये बोटी वाहून गेल्या; एका खलाशाचा मृत्यू, तिघे बेपत्ता!

वाहून जाणाऱ्या बोटीला वाचवण्यासाठी दुसरी बोट समुद्रात गेली आणि त्यानंतर...

तौते चक्रीवादळाचा कोकणाला मोठा फटका बसलेला असून मच्छिमार तसंच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. चक्रीवादळामुळे दर्याला उधाण आलं असून अनेक ठिकाणी किनाऱ्यावर उभ्या नौकांना फटका बसला आहे. देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत. तर एका खलाशाचा मृत्यू झाला आहे. डीजीआयपीआरने दिलेल्या माहितीनुसार, राजाराम कृष्णा कदम असं या खलाशाचं नाव असून तिघे बेपत्ता आहेत.

दिनानाथ जोशी, नंदकुमार नार्वेकर, प्रकाश गिरीद हे बेपत्ता आहेत. दरम्यान काही जण सुदैवाने बचावले असून सुखरुप बाहेर आले आहेत. देवगड उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास आंनदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या रघुनाथ यशवंत कोयंडे यांच्या रुक्मिणी या बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ती पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे, वाहून जाऊ लागली. त्यामुळे रुक्मिणी बोटीवरील खलाशांना वाचवण्यासाठी निरज यशवंत कोयंडे यांची आरची नावाची दुसरी बोट रुक्मिणी बोटी जवळ नेण्यात येत होती. पण, वादळी वाऱ्यामुळे आरची बोटीवरील खलाशांचे नियंत्रण सुटून दोन्ही मच्छिमार बोटी लगतच्या मौजे पालये किनाऱ्यावरील खडकावर आदळल्या. त्यानंतर दोन्ही बोटीवरील खलाशांनी पाण्यात उड्या मारल्या. या दोन्ही बोटींवर मिळून एकूण सात खलाशी होते. यापैकी तीन खलाशी सुखरूप बाहेर आले. तर चार खलाशी वाहून गेले. यापैकी एका खलाशाचा मृतदेह आज सकाळी देवगड मळई येथील खाडीमध्ये आढळून आला आहे. स्थानिक प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक लोकांच्या सहकार्याने इतर तीन बेपत्ता खलाशांचा शोध सुरू आहे. तसेच या दुर्घटनेनंतर उपविभागीय अधिकारी ( महसूल ) यांनी बचावलेल्या खलांशांची भेट घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2021 2:04 pm

Web Title: cyclone tauktae two boats capsizedin devagd cause one death sgy 87
Next Stories
1 “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्क फ्रॉम मंत्रालय कधी करणार?”
2 ‘किसान सन्मान निधी’चे पैसे तुघलकी पद्धतीने वसूल करायचं मोदी सरकारने ठरवलं का?’
3 Cyclone Tauktae : महाराष्ट्राला ‘तौते’चा फटका; पंतप्रधानांनी केली उद्धव ठाकरेंशी चर्चा
Just Now!
X