19 February 2019

News Flash

डीएसके प्रकरणात १,६०० पानी पुरवणी दोषारोप पत्र

शिरीष कुलकर्णी, अनुराधा पुरंदरे, विनय बडगंडी, केदार वांजपे, सई वांजपे, धनंजय पाचपोर यांच्या विरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले

डी. एस. कुलकर्णी

डी एस के प्रकरणात सोमवारी पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेने १६०० पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले. विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांच्या न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. शिरीष कुलकर्णी, अनुराधा पुरंदरे, विनय बडगंडी, केदार वांजपे, सई वांजपे, धनंजय पाचपोर यांच्या विरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून आत्तापर्यंत डी एस के प्रकरणात एकूण 2091 कोटींची फसवणूक निष्पन्न झाली आहे.

बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे समोर आले असून या प्रकरणी त्यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करत कुलकर्णी यांना अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी डीएसके यांची पुतणी सई वांजपे, तिचा पती केदार वांजपे, डीएसके कंपनीचा सीईओ धनंजय पाचपोर, फायनान्स हेड विनयकुमार बंडगंडी, मुलगा शिरीष कुलकर्णी,मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना देखील अटक करण्यात आली होती.

सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेने विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांच्या न्यायालयात १६०० पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले. शिरीष कुलकर्णी, अनुराधा पुरंदरे, विनय बडगंडी, केदार वांजपे, सई वांजपे, धनंजय पाचपोर यांच्या विरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

First Published on August 13, 2018 1:55 pm

Web Title: d s kulkarni fraud case pune police files 1600 pages supplementary charge sheet