परभणी : दलित समाजातील कुटुंबांना पिण्याचे पाणी देण्यास नकार देत जातिवाचक शिवीगाळ आणि मारहाण करण्याची घटना पाथरी तालुक्यात घडली आहे. दीड महिन्यात दुसऱ्यांदा घडलेल्या या प्रकरणी आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पाथरी तालुक्यातील खेरडा या गावी घडलेल्या या घटनेची माहिती अशी, दीड महिन्यापूर्वी गावातील दलित समाजातील काही कुटुंबांना पिण्याचे पाणी देण्यास नकार देत यावरून जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी गावातील रामचंद्र नामदेव आमले, दगडू रामभाऊ आमले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता.

Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

जामीन मंजूर झाल्यानंतर आरोपींनी गावात पुन्हा धमकावण्याचे प्रकार सुरू केले. यातूनच शुक्रवारी (दि. ४) आरोपींनी संबंधितांना पुन्हा जातिवाचक शिवीगाळ करत धमकावले. या घटनेची चित्रफीत ‘समाज माध्यमा’वर वेगाने पसरल्याने त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. या प्रकरणी विकास गंगाधर वाहेळ यांनी रविवारी (दि. ६) तक्रार दिल्यावर दोन्ही आरोपींना पाथरी पोलिसांनी अटक केली. त्यांना आज चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, गावातील तणावाचे वातावरण लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली.