25 September 2020

News Flash

लग्नासाठी तयार होत असताना नवरदेवाचा मृत्यू; मिरज येथिल घटना

ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मिरज : ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या नवरदेवाचे छायाचित्र.

मोठ्या उत्साहात काल हळदी समारंभ पार पडला. आज लग्न असल्याने सर्वांची तयारीची लगबग सुरु असताना अचानक नवऱ्यामुलाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मिरज येथे घडली आहे. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रवी मदन पिसे (वय २७, रा. शिवाजी पुतळा, मिरज) असे मृत्यू झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. कोल्हापूरची नवरी आणि मिरजचा नवरा असलेल्या या लग्नसोहळ्याचा आजचा (शनिवार) मुहूर्त होता. त्यासाठी ‘शाही दरबार’ या मिरज येथिल लग्नाच्या हॉलवर लगबग सुरु होती. दोन्हीकडचे पाहूणे मंडळी खुशीत होती. लग्नाची जय्यत तयारी करण्यात आली होती. आदल्या दिवशी (शुक्रवार) या भावी जोडीदारांचा हळदीचा कार्यक्रमही छान पार पडला होता. त्यानंतर हॉलवरून आज सकाळी तयारी करण्यासाठी नवरा मुलगा तानाजी चौकातील आपल्या घरी आला होता. साडे अकराचा लग्नाचा मुहुर्त होता. मात्र, सकाळी साडे नऊ वाजता त्याच्या छातीत जोराची कळ आली आणि तो चक्कर येऊन खाली कोसळला. या प्रकारानंतर नवऱ्या मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे कळते.

या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2017 1:03 pm

Web Title: death of groom while preparing for marriage miraj incident
Next Stories
1 पारपत्र पडताळणीसाठी पोलीस अर्जदाराच्या घरी
2 छतावरील पावसाचे पाणी साठविणारे संयंत्र शासनाकडून स्वीकृत
3 गरिबांमध्येच नव्हे तर श्रीमंतांमध्येही आहार मूल्यांचा अभाव
Just Now!
X