29 October 2020

News Flash

स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला तिरंगी फुलांची सजावट

झेंडू, शेवंती आणि कामिनी या फुलांचा करण्यात आला वापर

-मंदार लोहोकरे

देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला तिरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. झेंडू, शेवंती व कामिनी या फुलांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा गाभारा सजवण्यात आला आहे, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती विविध सण, उत्सव, स्वातंत्र दिन अशा महत्त्वाच्या दिवशी देवाला विशेषरित्या सजवण्यात येते. या पार्श्वभूमीवर आज स्वातंत्र दिनानिमित्त श्री विठ्ठल मंदिर सजवण्यात आले आहे. झेंडू, शेवंती आणि कामिनी या फुलांची सजावट करण्यात आली आहे.

पुण्यातील सचिनअण्णा चव्हाण आणि संदीपभाऊ पोकळे पाटील यांनी या सजावटीसाठी दान दिले आहे. मंदिर समितीमधील कर्मचारी यांनी याची सजावट केली आहे. या सजावटीबरोबरच पारंपरिक पोषाख आणि दागिन्यांमध्ये देवाचे रूप अधिक खुलून दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 12:31 pm

Web Title: decoration of tricolor flowers to vitthal rukmini on the occasion of independence day msr 87
Next Stories
1 राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील करोनाबाधित
2 आत्मनिर्भर भारताचा ग्रामीण चेहरा, बीडच्या तरुणाने पत्र्याच्या शेडमध्ये बनवलं भारतीय बनावटीचं सॉफ्टवेअर
3 कोकणात येताना करोना चाचणीची सक्ती
Just Now!
X