मिरज वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयासाठी ३०० कोटीचा निधी तत्काळ देण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार हाफिज धत्तुरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्बारे केली आहे.
    मिरज वैद्यकीय महाविद्यालयाला प्रारंभ होऊन अर्धशतकाचा कालावधी पूर्ण झाला असूनही अद्याप बरेच विभाग सुरूच करण्यात आलेले नाहीत. बर्न, रक्तपेढी, नìसग महाविद्यालय, कर्करोग निदान केंद्र, दंत महाविद्यालय ट्रामा सेंटर या ठिकाणी सुरू करणे आवश्यक असतानाही याकडे लक्ष दिले जात नाही.
    मिरजच्या वैद्यकीय महाविद्यालयाकडे ८० एकर जागा उपलब्ध असून महापालिकेकडे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ५ एकर जागा वर्ग करण्यात आली आहे. या बदल्यात महापालिकेने शहरातील रुग्णालयाची जागा देण्याचे मान्य केले आहे. मात्र हस्तांतर रखडले आहे. मोक्याची जागा खासगीकरणात जाण्याची शक्यता असून शासनाने तातडीने ही जागा नियमानुसार ताब्यात घ्यावी अशी मागणीही श्री. धत्तुरे यांनी केली आहे.