सत्तेसाठी शिवसेना किती काळ लाचार राहणार? असा प्रश्न विचारत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. छिंदवाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानाने उभारण्यात यावा अशीही मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. छिंदवाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी मराहाजांचा पुतळा हटवण्यासाठी बुलडोझरचा वापर करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसने शिदोरी या मुखपत्रात वीर सावरकर यांचा अपमान केला आहे. हे सगळं शिवसेनेला चालतं का? वीर सावरकर यांचा अपमान भाजपा कधीही सहन करणार नाही असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच सत्तेसाठी शिवसेना किती लाचारी पत्करणार आहे असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

शिदोरी या काँग्रेसच्या मुखपत्रात वीर सावरकर यांच्याविषयी गलिच्छ लिखाण करण्यात आले आहे. काँग्रेसने महापुरुषांच्या अपमानाची मालिकाच सुरु केली आहे. अशा सगळ्या परिस्थितीतही शिवसेना महाराष्ट्रात काँग्रेससोबत सत्तेत आहे. ही लाचारी शिवसेना किती काळ सहन करणार? छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांचा अपमान केल्या प्रकरणी काँग्रेसने माफी मागावी. भाजपा असे अपमान सहन करणार नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’ मध्ये वीर सावरकर यांच्याबाबत गलिच्छ लिखाण करण्यात आलं आहे. ज्याप्रकारे मध्यप्रदेशात काँग्रेसने गलिच्छ लिखाण केलं अगदी तसाच प्रकार शिदोरीमध्ये छापण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारच्या अभ्यासाचे वावडे असलेल्या शिवसेनेला ते तितकेच प्रिय आहे असा उल्लेख केला आहे. हेदेखील शिवसेनेला मान्य आहे का? सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला काँग्रेसने केलेलं लिखाण मान्य आहे का?. ‘स्वातंत्र्यवीर नव्हे माफीवीर’ हा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. शिवसेनेला हा अँगल मान्य आहे का? उद्धव ठाकरेंना हे मान्य आहे का?” असेही प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले.