28 February 2021

News Flash

देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी शरद पवारांची मुलाखत, बघू ते मुलाखत देतात का- संजय राऊत

संजय राऊत यांनी दिलं आव्हान

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची मुलाखत घ्यावी, पाहुयात ते मुलाखत देतात का, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. तुमचीही वृत्तपत्रं आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची मुलाख घ्यावी आणि मुलाखत छापण्याची हिंमत दाखवावी असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. टीव्ही ९ मराठीने संजय राऊत यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. काही दिवसांपूर्वीच फडणवीस यांनी सामना हे आधी शिवसेनेचं मुखपत्र होतं आता ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचंही मुखपत्र झाल्याचं म्हटलं आहे. या टीकेवर संजय राऊत यांनी उत्तर दिलंय, सामना हे लोकांचं वृत्तपत्र आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- शरद पवारांची मुलाखत म्हणजे ‘नुरा कुस्ती’, मॅच फिक्सिंग; फडणवीसांचा टोला

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत तीन भागांमध्ये झाली. यावर टीका करतान फडणवीस यांनी ही मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग किंवा नुरा कुस्तीसारखी आहे अशी टीका केली. मॅच फिक्सिंग एकदा संपूद्या मी त्यावर नक्की प्रतिक्रिया देईन असंही ते म्हणाले होते. एवढंच नाही तर करोनाच्या काळात राजकारण केलं जातं आहे. सरकार पाडायचा प्रयत्न होतो आहे असंही संजय राऊत म्हणाले होते. त्यावरही फडणवीस यांनी टीका केली. स्वतःच मारुन घ्यायचं आणि स्वतःच रडायचं ही नवी पद्धत आहे. कोणीही सरकार पाडत नाही तरीही यांचा कांगावा सुरु आहे असंही फडणवीस म्हणाले होते. या सगळ्या टीकेला आज संजय राऊत यांनी उत्तर दिलं.

आणखी वाचा- …तर पुढच्या निवडणुका सुद्धा एकत्र लढवू; शरद पवार यांचे सुतोवाच

करोनाकडे आमचं नीट लक्ष

एवढंच नाही तर करोनाच्या गंभीर आजाराकडे आमचं नीट लक्ष आहे. इतरांनी त्याची काळजी करु नये. धारावीत करोना नियंत्रणात आला त्यामागे इतर अनेक बिगर सरकारी संस्थांचीही मदत आहे, फक्त संघाने त्याचं श्रेय घेऊ नये असाही टोला संजय राऊत यांनी लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 2:59 pm

Web Title: devendra fadnavis should take mr sharad pawars interview lets see if he agree or not says sanjay raut scj 81
Next Stories
1 चंद्रपूर : कोविडच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई; साडेचार लाखांचा दंड वसूल
2 “…मग संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात करोनाचा कहर कसा?”; राजू शेट्टी यांचा चंद्रकांत पाटलांना सवाल
3 वसईतील पोलिसाचा करोनामुळे मृत्यू
Just Now!
X