24 February 2021

News Flash

धनंजय मुंडे यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार जाहीर

कै. लिमये यांच्या कन्या शोभाताई नेर्लीकर, जावई डॉ.विनायक नेर्लीकर यांच्या देणगीतून हा पुरस्कार दिला जातो

नाशिकच्या सार्वजनिक वाचलनालयातर्फे (सावाना) देण्यात येणारा कार्यक्षम आमदार पुरस्कार यंदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना जाहीर झाला आहे. येत्या ४ मार्च रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहीती वाचलनालयाचे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी दिली. माजी आमदार व पत्रकार (कै.माधवराव लिमये) यांच्या स्मृतीनिमित्त मागील १६ वर्षांपासून दिल्या जाणार्‍या या पुरस्कारासाठी यावर्षी धनंजय मुंडे यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी हा पुरस्कार बी.टी.देशमुख, गणपतराव देशमुख, आर.आर.पाटील, शोभाताई फडणवीस, जीवा पांडू गावित, दत्ताजी नलावडे, गिरीष बापट, सा.रे.पाटील, पांडुरंग फुंडकर, जयवंतराव पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, बच्चु कडू, निलम गोर्‍हे, गिरीष महाजन यांना देण्यात आला आहे.

५० हजार रूपये रोख, स्मृती चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून कै. लिमये यांच्या कन्या शोभाताई नेर्लीकर, जावई डॉ.विनायक नेर्लीकर यांच्या देणगीतून हा पुरस्कार दिला जातो. आ.हेमंत टकले, ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.विलास औरंगाबादकर, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, डॉ.नेर्लीकर दाम्पत्य यांच्या निवड समितीने मुंडे यांची यावर्षीच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे. ४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृहात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

धनंजय मुंडे मागील ८ वर्षांपासून विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहत आहेत. साडेचार वर्षांपासून विरोधी पक्षनेते म्हणुन काम करताना त्यांनी सभागृहात शेतकरी, युवक, बेरोजगार, महिला, कष्टकरी व सामान्य नागरीकांच्या प्रश्‍नांवर विविध माध्यमातून आवाज उठवण्याचे काम केले आहे. राज्यातील १६ मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे सभागृहात पुराव्यानिशी मांडून त्यांनी आपली एक वेगळी छाप सभागृहात पाडली आहे. एक अतिशय आक्रमक, अभ्यासू आमदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 6:37 pm

Web Title: dhananjay munde announce active mla by nashik sarvajanik vachanalay
Next Stories
1 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत पाणी न मिळाल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू ?
2 Bhima Koregaon case: पोलिसांकडून 1, 837 पानी आरोपपत्र दाखल
3 औरंगाबाद : आत्महत्या न करता शेतकर्‍यांनी प्रेरणा घ्यावी अशी निवृत्त पोलिस अधिकार्‍याची शेती
Just Now!
X