नांदेड महानगरपालिका निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी एकहाती सत्ता मिळवत पुन्हा एकदा आपला गड राखला. निवडणुकीत भाजपने मोठी ताकद लावली होती. मात्र, त्यांना यश मिळवता आले नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी नांदेडमधील निकाल म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार विरोधातील जनतेची प्रतिक्रिया असल्याचं म्हटलं. तसेच धर्मनिरपेक्ष पक्षाचा विजय झाला, याबद्दल समाधान असल्याचं सांगत मुंडे यांनी अशोक चव्हाणांचे अभिनंदन केलं.

नांदेडमध्ये पुन्हा ‘अशोकपर्व’, भाजपच्या राज्यातील घोडदौडीला लगाम

राज्यात परतीच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेशसह राज्यातील सर्व भागात मागील काही दिवसांपासून परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर येत आहे. या परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. मराठवाड्यात सोयाबीनसह मका,कपाशी, उडीद, मुग इत्यादी पिकांचे नुकसान झालेले आहे. विदर्भातील कापूस, सोयाबीन भिजल्याने कापूस उत्पादक, धान उत्पादक शेतकरीही धास्तावला आहे.  फळबागा, भाजीपाला यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सुरुवातीच्या काळात पावसाचा पडलेला खंड, त्यानंतर झालेली अतिवृष्टी आणि रोगांच्या साथी, किडींचा प्रादुर्भाव यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले असताना परतीच्या पावसाने उरल्या सुरल्या पिकांचेही नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

नांदेडमधील विजयातून अशोक चव्हाणांचे नारायण राणेंना चोख प्रत्युत्तर