04 March 2021

News Flash

परिवहन निरीक्षकासोबत आरटीओ एजंटची हमरीतुमरी

गुन्हा दाखल होताच एजंट झाला फरार

प्रतिनिधिक छायाचित्र

ओळखीच्या ट्रकचे तातडीने चेकींग करुन द्या असे म्हणत परिवहन निरीक्षकांच्या फाईल अस्ताव्यस्त फेकल्या प्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात एजंट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल होताच हा एजंट फरार झाला आहे.
शहरातील करोडी परिसरात बसेस आणि अवजड ट्रकची परिवहन कार्यालयाकडून नियमित तपासणी होत असते. शनिवारी दुपारी १ वाजता अशी वाहन तपासणी सुरु असतांना आर.टी.ओ. एजंट मो.मुसा हसन मो.मोसिन (५०) याने परिवहन निरीक्षक अर्जुन गुजर यांना ओळखीचे ट्रक आधी तपासा असा हुकूम सोडला.

एजंटच्या अरेरावीमुळे संतापलेले निरीक्षक गुजर यांनी नियमाप्रमाणे तपासणी होईल असे म्हणताच ज्या ओळखीचे ट्रक तपासण्याचा आग्रह आरोपी मुसा करत होता. कारण ट्रक मालकांनी मुसाला जाब विचारयला सुरुवात केली.त्यामुळे मुसाने गुजर यांच्या फाईल फेकून दिल्या, या प्रकरणी गुजर यांनी सरकारी कामात अडथळा करणार्‍या एजंट च्या विरोधात दौलताबाद पोलिसांकडे तक्रार दिली.हे प्रकरण वाढत असल्याचे लक्षात येताच एजंट मुसा फरार झाला. आता या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 9:14 pm

Web Title: dispute between rto agent and rto officer in aurnagabad
Next Stories
1 मालवाहतूक वाहने ओव्हरलोड झाल्यास होणार गुन्हा दाखल – रावते
2 सावधान! दारु पिऊन वाहन चालविल्यास परवाना ६ महिन्यांसाठी निलंबित
3 भय्यू महाराजांच्या मोबाइलमुळे होणार आत्महत्येचा उलगडा?
Just Now!
X