जायकवाडी प्रकल्पाच्या वरच्या बाजूस असलेल्या अपूर्ण व पाणी वापर निर्धारित न झालेल्या प्रकल्पांचे दरवाजे संपूर्ण उघडे ठेवून व अन्य प्रकल्पातून अंशत: पाणीप्रवाह जायकवाडी प्रकल्पासाठी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यासाठी आदेश जारी करावेत, अशी मागणी भाकपचे परभणी जिल्हा निमंत्रक कॉ. राजन क्षीरसागर यांनी केली.
जायकवाडी प्रकल्पाच्या वरच्या बाजूस ११५ टीएमसी पाणी वापर मंजूर असताना १८७ टीएमसीपेक्षा जास्त क्षमतेची धरणे व प्रकल्प वरच्या बाजूस उभारले. मंजूर पाणी वापरापेक्षा जास्त पाणीसाठा वरच्या बाजूस करण्यात येत असल्याने सामान्य पर्जन्यमान वर्षांतही जायकवाडी धरण भरत नाही. यंदा अल-निनो प्रभावामुळे मान्सून पावसामध्ये घट व अनिश्चितता असल्याचे तज्ज्ञ, जाणकार सांगत आहेत. सामान्य पर्जन्यकाळातही धरण भरल्यानंतर सांडव्यावरून नदीपात्रात पाणी न जाऊ देता खरिपातच कालवे चालवून नदीपात्रात पाणी न सोडण्याचा पालखेड प्रकल्पातील गरप्रकार उघड झाला आहे. यंदा मान्सूनसंबंधी व पावसाच्या अनिश्चिततेच्या पाश्र्वभूमीवर जायकवाडी प्रकल्पाला खात्रीशीर पाणीसाठा उपलब्ध करून द्यावा. त्यासाठी पुढील उपाय योजून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा २००५मधील तरतुदींचा अवलंब करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
पाऊस चालू असताना कालव्यातून पाणी सोडून जायकवाडीत येणाऱ्या पाण्याचा मार्ग बदलण्याचे बेकायदा प्रकार पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केल्यास दंडात्मक कारवाई करावी. मात्र, ३३ टक्क्य़ांपेक्षा जास्त साठा असलेल्या वरच्या बाजूच्या धरणाचे टेक्नोसोशल लिगल टीएसएल ऑडीट करावे. धरणात आज ३३ टक्क्य़ांपेक्षा जास्त साठा असणे याचा अर्थ आजपर्यंत सुमारे ३० टक्के पाणी बाष्पीभवनात वाया गेले हे स्पष्ट होते. जायकवाडीसह माजलगाव व सीना कोळेगाव प्रकल्पासाठी वरीलप्रमाणे आदेश द्यावेत. जायकवाडीसह पूर्ण झालेल्या सर्व प्रकल्पांतील लाभधारक शेतकऱ्यांना सिंचन कायदा ७६अन्वये कमांड नोटिफिकेशन व पाणी हक्कदारीचे आदेश लागू असल्याची हमी द्यावी. जायकवाडी विभाग क्रमांक दोनमध्ये ४३ शाखा अभियंते पदे मंजूर असताना केवळ १० शाखा अभियंते ठेवून सर्व प्रशासन व सिंचन व्यवस्थापन मोडीत काढणारे गरप्रकार तत्काळ थांबवावेत. सिंचन व्यवस्थापनासाठी पुरेशा यंत्रणेची हमी द्यावी, असे जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर क्षीरसागर, मुंजा लिपणे, तुकाराम िशदे, सखाराम मगर, शेख अब्दुल यांच्या सह्य़ा आहेत.