राज्यातील करोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यातच राज्यातील हा आकडा ३०० पार गेला आहे. मुंबईसह पुण्यातही करोनाचे काही नवीन रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार.डॉ अमोल कोल्हे यांनी करोना संदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी करोना व्हायरसचा होणारा गुणाकार समजावून सांगितला आहे.

त्यांनी या व्हिडीओमध्ये करोनाचा गुणाकार समजावताना एक महत्त्वाचं उदाहरण दिलं आहे. लॉकडाउनदरम्यान एक व्यक्ती नियम मोडून मुंबईहून जुन्नरला आली. त्यानंत १७ मार्च रोजी ही व्यक्ती अनेकांना भेटली. त्यातच २७-२८ मार्चदरम्यान या व्यक्तीला करोना झाल्याचं आढळून आलं, असं उदाहरण त्यांनी यावेळी दिलं आहे.

दरम्यान, या व्यक्तीला करोनाची लागण झाली होती. त्या व्यक्तीच्या संपर्कात मुंबईच्या आणि डिंगोरेच्या एका व्यक्तीलाही ही लागण झाली. डिंगोरेच्या एका व्यक्तीला ३१ तारखेला ही लक्षणं आढळून आली. दरम्यान, पहिली व्यक्ती १७ मार्च ते ३० मार्च दरम्यान अनेकांना भेटली आणि त्याच्या शरीरात हा विषाणू १४ दिवस होता. याचाच अर्थ ३० मार्चला ही व्यक्ती ज्यांना भेटली त्यांच्या शरीरात ही लक्षणं १३ एप्रिलनंतर दिसून येतील. अशा पद्धतीनं हा गुणाकार होत आहे. त्यामुळे सर्वांनी आपली काळजी घ्यावी, असं आवाहन कोल्हे यांनी केलं आहे.