जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता अभियानाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारती यांनी शनिवारी सकाळी िततरवणी परिसरातील शेतात विष घेतले. या प्रकारानंतर त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. भारती यांनी विष का घेतले याचे कारण समजले नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांची स्वच्छता अभियानात तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
जि. प.च्या सामान्य प्रशासनात कार्यरत असलेल्या भारती यांची काही महिनेच सेवा राहिली असताना तडकाफडकी ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता अभियानात बदली करण्यात आली होती. कायम चच्रेत असलेल्या भारती यांना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास शहरातील दीप रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. त्यांनी रोगर नावाचे विष प्राशन केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयाचे डॉ. अनंत मुळे यांनी सांगितले.
भारती हे शनिवारी सकाळी आपले मूळ गाव गेवराई तालुक्यातील िततरवणीला गेले होते. तेथून त्यांनी मुलगा संजयशी संपर्क केला आणि थोडय़ात वेळात शेतात विष घेतल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या वाहनचालकाने व इतर सहकाऱ्यांनी त्यांना बीडला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत नोंद करण्यात आली. जि. प.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन भारती यांच्या प्रकृतीची चौकशी केली.