वर्धा येथील दत्ता मेघे आर्युविज्ञान अभिमत विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांना राज्यपालांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.
मुंबईच्या राजभवनात आयोजित एका समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ. बोरले यांनी स्वीकारला. आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यातील निवडक डॉक्टरांचा या समारंभात गौरव झाला.

डॉक्टर्स डिरेक्टरी इंडिया व क्लाउड फाउंडेशनतर्फे हे पुरस्कार दरवर्षी दिल्या जातात. यावेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर एका छोटेखानी समारंभात हा पुरस्कार वितरन सोहळा घेण्यात आला होता. आयोजक संस्थेचे डॉ. गिरिष कामत व डॉ. देवेंद्र हंबरडीकर यांनी प्रास्ताविकातून पुस्काराची भूमिका मांडली. तर राज्यपाल कोश्यारी यांनी वैद्यकीय क्षेत्रात महाराष्ट्राने आदर्श प्रस्थापित करण्याचे आवाहन केले.

मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार
singer kartiki gaikwad father pandit kalyanji gaikwad awarded shri sant eknath maharaj swar martand from govind giri maharaj
कार्तिकी गायकवाडच्या वडिलांचा मानाच्या पुरस्काराने गौरव, पोस्ट करत म्हणाली, “हा पुरस्कार म्हणजे साक्षात…”
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित

सोहळ्यात डॉ. बोरले यांना तसेच डॉ. डी.जे. आरवाडे, वैद्य गोपालकृष्ण अंधनकर व डॉ. राजाराम जगताप यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. बोरले हे गत चाळीस वर्षापासून दंत चिकित्सा विषयात सेवा देत आहेत. सेवाग्रामच्या रूग्णालयात सेवेची सुरूवात झाल्यानंतर त्यांनी सावंगीच्या रूग्णालयात पदभार सांभाळला. दोन तपाहून अधिक काळ कार्य केल्यानंतर त्यांना व्यवस्थापनाने कुलगुरू पदाची जबाबदारी सोपविली. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रावर विविध पुस्तके लिहली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रहीय वैद्यकीय मासिकात त्यांचे संशोधनपर लेख प्रसिध्द झाले आहे. विद्यापिठाचे कुलपती दत्ता मेघे यांनी डॉ. बोरले यांचे अभिनंदन करतांना विद्यार्थीप्रिय शिक्षकाचा हा यथोचित सन्मान असल्याचे नमूद केले.