News Flash

स्नेहसंमेलनाच्या दिवशी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

अमरान मडावी हा येरलीच्या आश्रमशाळेत पहिल्या वर्गात शिकत होता.

तुमसर तालुक्यातील पचारा येथील घटना

गोंदिया : तुमसर तालुक्यातील पचारा येथे गावालगतच्या तलावात विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळला. गुरुवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. अमरान संजय मडावी (७) रा. पचारा ता. तुमसर असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या दिवशीच ही घटना समोर आल्याने स्नेहसंमेलन रद्द करण्यात आल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.

अमरान मडावी हा येरलीच्या आश्रमशाळेत पहिल्या वर्गात शिकत होता. गुरुवारी आश्रमशाळेत स्नेहसंमेलन होते. दोन दिवसाअगोदर अमरान मडावी हा पचारा येथे घरी गेला होता. गुरुवारी स्नेहसंमेलन असल्याबद्दल तो वडिलांना बोलला.

परंतु मोलमजुरी करणाऱ्या वडिलाने एका दिवसाची मजुरी जाईल म्हणून स्नेहसंमेलन कार्यक्रमास जाण्यास नकार दिला. त्यामुळे अमरान बुधवारी गावाहून येरली येथे शाळेत गेला. आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना राहण्याची सोय असते. परंतु, अमरान गुरुवारी शाळेतून गावाकडे आला. नंतर गावाशेजारच्या तलावात त्याचा मृतदेह सापडल्याने चर्चेला पेव फुटले आहे.

अमरान हा शाळेत गेला असताना गावाकडे कसा आला? असा प्रश्न उपस्थित झाला असून तुमसर पोलिसांनी प्रकरण दाखल केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 2:10 am

Web Title: drowning death of students akp 94 2
Next Stories
1 पंढरपुरात रंगला विठ्ठल-रुक्मिणीचा विवाह सोहळा
2 अल्पवयीन मूकबधिर मुलीवर बलात्कार प्रकरणी जन्मठेप
3 विधान परिषद पोटनिवडणूक आज ; यवतमाळमधून कोण बाजी मारणार?
Just Now!
X