महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेतली जाणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० ही नियोजित वेळापत्रकारनुसारच घेतली जाईल, असे आयोगाने जाहीर केले आहे. करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर १६ ते ३१ मार्च या कालावधीत कुठल्याही परीक्षा न घेण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. मात्र, या कालावधीत एमपीएससीची कुठलीही परीक्षा नसल्याने ५ एप्रिल रोजी होणारी पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकारनुसारच पार पडणार आहे. आयोगाने एका पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
#MPSC #राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० च्या आयोजनाबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे प्रसिद्धीपत्रक… pic.twitter.com/6rnPwZ7j1v
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 17, 2020
अयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, राज्य शासनाने १५ मार्च रोजी काढलेल्या शासकीय आदेशाद्वारे करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं एमपीएससीच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, या कालावधीत एमपीएससीकडून कुठल्याही परीक्षांचे नियोजन नसल्यानं पुढील परीक्षा नियोजित कार्यक्रमानुसार होतील.
दरम्यान, आयोगानं म्हटलं की, ५ एप्रिल रोजी होणारी पूर्वपरीक्षा ही नियोजित कार्यक्रमानुसारच होईल. यासाठीची सर्व पूर्वतयारी झाली असून योग्य ती दक्षता घेऊन ही परीक्षा पार पाडली जाईल. त्यामुळे या परीक्षेची तयारी उमेदवारांनी सुरु ठेवावी असे आवाहनही आयोगाकडून करण्यात आलं आहे.