27 September 2020

News Flash

अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्राच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ

मुसळधार पावसामुळे अभियांत्रिकी आणि औषध निर्माण शास्त्र आदीच्या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला असून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय

(संग्रहित छायाचित्र)

राज्यभरात शनिवारपासून पावसाचा जोर कायम आहे, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच राज्यातील व्यवसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राज्य सीईटी सेलच्यावतीने राबविण्यात येत आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी कॅप राऊंड सुरु आहेत. मात्र मुसळधार पावसामुळे अभियांत्रिकी आणि औषध निर्माण शास्त्र आदीच्या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला असून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होतेय. ही बाब ओळखून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तावडे यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीची मुदत दोन दिवस वाढवली आहे.

ट्विटरद्वारे तावडे यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत कॅप सेंटरवर जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहेत. दरम्यान, विद्यार्थांना फार्मसी अभ्यासक्रमाचे प्रवेश आज रविवार(28 जुलै ) संध्याकाळपर्यंत निश्चित करता येणार आहेत. अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र आदी अभ्यासक्रमाचे प्रवेश सोमवार(29 जुलै )पर्यंत निश्चित करण्यास, मुदत वाढ देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2019 9:14 am

Web Title: due to heavy rains engineering and pharmacy admission process extended sas 89
Next Stories
1 भाजपाप्रवेशाबाबत कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : राणाजगजीत सिंह पाटील
2 मुंबई-ठाण्यात मुसळधार, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा, कोकणातील जनजीवन विस्कळीत
3 रायगड जिल्ह्यात पूरस्थिती
Just Now!
X