16 January 2019

News Flash

नागपूर सामूहिक हत्येनं हादरलं, एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या

नागपुरात एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे

(संग्रहित छायाचित्र)

नागपुरात एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दिघोरी येथे मध्यरात्री हा हत्याकांड झाला आहे. या हत्याकांडामुळे नागपूरकर प्रंचड हादरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिघोरी येथे कमलाकर पवनकर यांच्यासह पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मध्यरात्री धारदार शस्त्राने ही हत्या करण्यात आली. हत्या करण्यात आलेल्यांमध्ये लहान मुलगा, मुलीसह एका वृद्ध महिलेचा समावेश आहे.

मृतांची नावे कमलाकर पवनकर, अर्चना (पत्नी), वेदांती (मुलगी), गणेश (भाचा) आणि मीराबाई (आई) अशी आहेत. कमलाकर पवनकर यांचा प्रॉपर्टीचा व्यवसाय असून ही हत्या संपत्तीच्या वादातून झाला असल्याचा संशय आहे. कमलाकर पवनकर यांची १० एकर जमीन असून त्यावरुन त्यांच्यात आणि नातेवाईकांमध्ये वाद सुरु होता अशीही माहिती मिळत आहे. त्यादृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरु आहे.

घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचं निष्पन्न होत नसल्याने कोणीतरी ओळखीच्या व्यक्तीने हत्या केला असल्याचाही संशय आहे. पोलिसांना अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत.

First Published on June 11, 2018 8:43 am

Web Title: family killed in nagpur