18 February 2020

News Flash

अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

सावकाराकडून कर्ज काढून त्यांनी दोन एकर शेतीमध्ये सोयाबीन व तूर पिकाची पेरणी केली होती.

प्रतिनिधिक छायाचित्र

अकोला : पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून विष प्राशन केले. उपचारादरम्यान त्या शेतकऱ्याचा मध्यरात्री मृत्यू झाला. शेख सुलेमान शेख गफूर (४२) असे मृताचे नाव आहे.

मृत शेख सुलेमान व त्याचा भाऊ  शेख सुलतान यांच्या नावाने सामूहिक दोन एकर शेती आहे. सावकाराकडून कर्ज काढून त्यांनी दोन एकर शेतीमध्ये सोयाबीन व तूर पिकाची पेरणी केली होती. परंतु, अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांच्या उत्पादन मोठय़ा प्रमाणात घट झाली. पेरणीसाठीचा खर्च ही निघत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे खचून जाऊन शेख सुलेमान यांनी स्वत:च्या शेतात विष प्राशन केले. गंभीर अवस्थेत ते घरी गेले. प्रकृती बिघडल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले. अखेर मंगळवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

First Published on January 16, 2020 2:13 am

Web Title: farmer suicide akp 94 2
Next Stories
1 अमरावतीत बनावट नोटांचा गोरखधंदा उघड, दोघांना अटक
2 नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात दुर्मीळ पांढऱ्या रंगाचा सांबर
3 ‘गुगल ट्रान्सलेटर’चे घोळ दुरुस्तीसाठी प्रशासनाची धावपळ
Just Now!
X