व्हॉट्सअप ग्रुपवर धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश टाकल्याप्रकरणी एका ग्रुपच्या अ‍ॅडमीनसह 11 जणांविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ग्रुपवर धार्मिक तेढ व दुही निर्माण करणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी पोलिसांना  ट्विटरवरून यासंबंधी तक्रार प्राप्त झाली होती.

एका व्हॉट्सॲप ग्रुपवर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारा मेसेज ग्रुपवर टाकला गेला होता. या ग्रुपच्या दहा अ‍ॅडमीनसह  ग्रुपवर संदेश  टाकणाऱ्या अन्य एक अशा 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ

बोईसर येथील एका व्हॉट्सॲप ग्रुपवर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, एकोप्यात  बाधा निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग होईल या दृष्टिकोनातून व्हॉट्सअपवर एक पोस्ट टाकण्यात आली होती. या ग्रुपवर प्रसारित आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांना ट्विटरवरुन तक्रार प्राप्त झाली होती. बोईसर पोलिसांनी त्या अनुषंगाने व्हाट्सअप ग्रुप ॲडमिन व पोस्ट टाकणाऱ्या आरोपीविरोधात माहिती घेत त्यांच्याविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात IT १२२/२०२० भा.द.वि. सं.का. कलम १५३ (अ)(ब)  ५०५ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल  केला आहे. गुन्हा दाखल केलेल्याना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.