News Flash

‘करोना’ संशयितांची नाव उघड करणारा मनसे उपाध्यक्ष गोत्यात

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश त्यांनी धाब्यावर बसवले आहेत.

प्रतिकात्मक छायाचित्र

करोनाग्रस्त रुग्णांची नाव उघड करु नयेत असे प्रशासनाचे आदेश असताना हे आदेश धाब्यावर बसवून रुग्णांची नाव उघड केल्याचा प्रकार राज्यात समोर आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) उपाध्यक्ष संजीव पाखरे यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विलगिकरण कक्षात उपचार घेत असलेले तीन रुग्ण तिथून कोणालाही न सांगता निघून गेले होते. या रुग्णांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या नावासह सरकारी कामासाठी एक पत्र तयार करण्यात होतं. दरम्यान, हे तिघेही पुन्हा रुग्णालयात दाखल झाले. मात्र, तोवर त्यांच्या नावाचं पत्र व्हायरलं झालं होतं.

दरम्यान, रुग्णालयाच्या एका कर्मचाऱ्याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी याबाबत पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार, सायबर सेलने केलेल्या तपासात पुण्यातील मनसेचे उपाध्यक्ष संजीव पाखरे यांनी ही नावं व्हायरल केल्याचं उघड झालं आहे. त्यानुसार, पाखरे यांच्यावर आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यान्वये बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 10:46 am

Web Title: fir filed on mns vice president sanjiv pakhare to reveal names of corona suspects aau 85
Next Stories
1 CoronaVirus : प्रेरणादायी गोष्ट; जगभर थैमान घालणारा ‘प्लेग’ कोल्हापुरात टिकू शकला नाही
2 Coronavirus: करोनाग्रस्त रुग्णांचे कपडे धुण्यास धोब्यांचा नकार!
3 Coronavirus : रत्नागिरीत एकजण करोनाचा रूग्ण असल्याचे निष्पन्न
Just Now!
X