News Flash

कन्याकुमारी एक्स्प्रेसच्या इंजिनला आग

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मुंबईकडे निघालेल्या कन्याकुमारी एक्स्प्रेसच्या इंजिनला अचानकपणे आग लागल्यामुळे गाडी थांबविण्यात आली. सोलापूरच्या अलिकडे अक्कलकोटजवळ हा प्रकार घडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
कन्याकुमारी एक्स्प्रेस सोलापूरच्या अलिकडे अक्कलकोट ते तिलाटी स्थानकाच्या दरम्यान धावत असताना अचानकपणे गाडीच्या इंजिनला आग लागून ठिणग्या पडत असल्याचे निर्दशनात आले. तेव्हा तात्काळ गाडी थांबवून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न चालू करण्यात आले. आग भडकल्यामुळे जळीतग्रस्त इंजिन गाडीपासून वेगळा करण्यात आला.
दरम्यान, दुसरे इंजिन मागवून गाडी पुढे रवाना करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 10:49 pm

Web Title: fire takes place in kanyakumari express
Next Stories
1 प्रस्तावित बेमुदत शाळा बंद आंदोलन तूर्त मागे
2 पंकजा मुंडेंना मंत्रिपदावरून हटविण्याची राष्ट्रवादीची मागणी
3 डोळ्यात मिरची पावडर टाकून १५ लाखांची रोकड लुटली
Just Now!
X