शालेय पोषण आहाराअंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या खिचडीत पाल पडल्याने सुमारे ६०हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. हिंगोली तालुक्यातील समगा येथील जि. प. शाळेत शनिवारी सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली.
पाल पडलेली खिचडी खाल्ल्याने आधी ३० विद्यार्थ्यांना उलटय़ा व मळमळ सुरू झाली. िहगोलीहून तातडीने दोन रुग्णवाहिका बोलावून या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गावातही आरोग्यपथक दाखल झाले. जिल्हा रुग्णालयात सुमारे ३०, तर गावच्या शाळेत सुरू केलेल्या शिबिरात ३१ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान, पालीसह थोडी खिचडी सीलबंद डब्यात पॅक करून अन्न व औषध विभाग कार्यालयाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आली.
समगा येथे जि. प.ची पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. शाळेत सुमारे ३०७ विद्यार्थी शिक्षण घेतात. शनिवारी २९२ विद्यार्थी शाळेत हजर होते. पोषण आहारात प्रतिदिन दिली जाणारी खिचडी विद्यार्थ्यांना सकाळी साडेदहाच्या सुमारास वाटप करण्यात आली. २०३ विद्यार्थ्यांनी, तसेच ३ शिक्षकांनी ही खिचडी खाल्ली. मात्र, एका विद्यार्थ्यांच्या डब्यात पालीचे मुंडके आढळून आले. त्याने ते इतरांना सांगितले. या दरम्यान २० ते २५ विद्यार्थ्यांना पोटात मळमळ सुरू होऊन उलटय़ा झाल्या. शिक्षकांनी तातडीने १०८ क्रमांकावर दूरध्वनी करून रुग्णवाहिका बोलावून घेतली. विद्यार्थ्यांना उलटय़ा होत असल्याचे कळताच त्यांच्या पालकांनी शाळेत गर्दी केली. शिक्षकांनी दोन रुग्णवाहिकांमधून विद्यार्थ्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठविले. जिल्हा रुग्णालयात ९३ हून अधिक विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या वेळी रुग्णालयात ३० विद्यार्थ्यांना दाखल करून घेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश रूणवाल, डॉ. रमेश कुटे यांचे पथक तत्परतेने समगा येथे पोहोचले. शाळेत असलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांची या पथकाने आरोग्य तपासणी केली. यापकी ३१ विद्यार्थ्यांना शाळेच्या खोलीत सुरू केलेल्या शिबिरात दाखल केले. ३१ विद्यार्थ्यांवर उपचार चालू असून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. खिचडीत पडलेल्या पालीच्या अवयवासह खिचडी सील करून अन्न व औषध विभागाकडे तपासणीसाठी पाठविल्याचे डॉ. रूणवाल यांनी सांगितले.
शुभम सरकटे, सोनाली सरकटे, निकिता सरकटे, निकिषा इंगळे, संतोष तात्तेपूर, सारिका प्रभाकर, प्राची सरकटे, पल्लवी सरकटे, वैष्णवी कुरवाडे, संतोष सुधाकर, शिवकन्या सरकटे, वैशाली खिल्लारे, रुपाली गरड, पुनम इंगळे, नामदेव गिराम, तुळशीराम गिराम, आरती इंगळे, पुनम इंगळे, सोपान सरकटे, ऋतुजा वाकोडे, सागर महाले, ओंकार िशदे, सचिन कुडे, अंजली खोडके आदी विद्यार्थी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. रोहिणी खंदारे, अमोल इंगळे, नाजिया पाशा, आदित्य सरकटे, साहिल पठाण, ज्ञानेश्वर वाघ, ओंकार कानडे, कोमल कानडे, इजाअली पठाण, विनायक भालेराव आदी विद्यार्थ्यांवर समगा येथील शाळेच्या शिबिरात उपचार करण्यात आले. माहिती मिळताच शिक्षणाधिकारी शिवाजी पवार, िहगोलीचे उपनगराध्यक्ष जगजितराज खुराणा यांनी रुग्णालयासह शाळेत येऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. या प्रकारानंतर जिल्हा रुग्णालयात विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठी गर्दी केल्यामुळे स्थितीवर नियंत्रणासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.

indian Institute of technology students package drastically reduced due to global economic slowdown
गलेलठ्ठ वेतनाच्या ‘आयआयटी’च्या ऐटीला तडा
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Nagpur RTO has succeeded in getting 90 percent revenue compared to target given by government
नागपूर ‘आरटीओ’ मालामाल! गेल्यावर्षीच्या तुलनेत…