22 January 2021

News Flash

“… तर आम्ही घरी जातो,” फडणवीस झाले आक्रमक

करोना, पूरपरिस्थितीवरील चर्चेवरून फडणवीसांचा संताप

विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावरी हक्कभंग प्रस्ताव आणि त्यावरील चर्चेला आक्षेप घेतला होता. तसंच अर्णब गोस्वामी यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केल्यानंतर भाजपाच्या आमदारांनी सभागृगहात गोंधळ घातला होता. त्यानंतर कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आलं होतं. “चर्चाच करायची नसेल तर आम्ही घरी जातो. कोरोनावर चर्चा होत नसेल, शेतकऱ्यांवर चर्चा होत नसेल, पूरग्रस्तांवर चर्चा होत नसेल, तर आम्ही येथे कशाला बसायचं,” असं म्हणत फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.

आणखी वाचा- मुख्यमंत्र्यांनी मुंबई, उपमुख्यमंत्र्यांनी पुणे पाहायचं, बाकीच्या जिल्ह्यांना कोण वाली?; फडणवीसांचा सवाल

“जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी आम्हाला सभागृहात बोलावलं. तसंच ३ वाजता चर्चा करण्याचं आश्वासन दिलं. शिवसेनेचे आमदार एकामागून एक विषय काढत आहेत. मग आता चर्चा ५ वाजता करा. करोना, शेतकऱ्यांचे असे महत्त्वाचे विषय असताना असं कसं चालेल? त्यामुळे ३ वाजल्यानंतर चर्चा केली पाहिजे. आता आपण ही चर्चा केली तर ३ वाजता मंत्र्यांच्या उत्तरासह ही चर्चा संपवावी लागणार आहे,” असं फडणवीस म्हणाले. “चर्चाच करायची नसेल तर आम्ही घरी जातो. कोरोनावर चर्चा होत नसेल, शेतकऱ्यांवर चर्चा होत नसेल, पूरग्रस्तांवर चर्चा होत नसेल, तर आम्ही येथे कशाला बसायचं,” असं म्हणत फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.

आणखी वाचा- “आलेला प्रत्येक तिसरा माणूस तिथं मरत असेल, तर ते कोविड सेंटर आहे की मृत्यूचं आगार”

राज्यात नवे हॉटस्पॉट

या कोविडच्या काळात आम्ही समजुतीनं वागलो. कोविड बाबत आम्ही अनेकदा काही सांगितलं. सरकारला पत्र पाठवली. पण आतापर्यंत एकाही पत्राला उत्तर मिळालं नाही. आज ज्या प्रकारे कामकाज चालवतोय त्यावरून करोनावर गंभीर नाही असं वाटतं. करोना, पूर परिस्थितीवर चर्चा केली पाहिजे. महाराष्ट्रात करोनाचं थैमान आहे. देशातील पाच राज्यांमध्ये ७० टक्के मृत्यू आहेत. तर त्या ७० टक्क्यांपैकी ५० टक्के मृत्यू हे महाराष्ट्रात आहे. आता राज्यात नवे हॉटस्पॉट तयार झालेत. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये मृत्यूचं प्रमाणही वाढलंय. राज्यात भयावय परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र भारतात कायम नंबर एक होता. तो करोनात व्हावा अशी आमची इच्छा नव्हती. परंतु आता महाराष्ट्राशी कोणाचीही तुलनाच नसल्याचं

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 1:26 pm

Web Title: former cm devendra fadnavis vidhan sabha coronavirus flood maharashtra conditions cm uddhav thackeray jud 87
Next Stories
1 राज्यात २४ तासांत आणखी ३४८ पोलीस करोनाबाधित, एकाचा मृ्त्यू
2 करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती लपवल्याप्रकरणी गुन्हा दाखल
3 नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड
Just Now!
X