09 March 2021

News Flash

“आम्ही विचार केला त्यापेक्षा अधिकच नॉटी आहेत”; अमृता फडणवीसांचा राऊतांना अप्रत्यक्षरित्या टोला

कंगना आणि संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत

अभिनेत्री कंगना रणौत म्हणजे नॉटी गर्ल आहे असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी केलं. एवढंच नाही तर हरामखोर या शब्दाचा अर्थही त्यांनी उलगडून सांगितला होता. हरामखोर म्हणजे मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजे खट्याळ मुलगी आहे आणि बेईमान आहे. असं मला वाटतं.. असं आता संजय राऊत म्हणाले होते. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. काही दिवसांपूर्वीच कंगनाने तिला मुंबई ही पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते असं म्हटलं होतं. त्यानंतर कंगना आणि संजय राऊत यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा या वक्तव्यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

“आम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी आहेत,” असं म्हणत अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता टोला लगावला. त्यांनी ट्विटरवरून राऊत यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. यापूर्वीही अमृता फडणवीस यांनी शिवसेनेच्या जोडे मारो आंदोलनावरून टीका केली होती.

आणखी वाचा- कंगना तर ‘नॉटी गर्ल’, संजय राऊत यांचं वक्तव्य, उलगडला हरामखोर शब्दाचा अर्थ

राज्यात सुरु असलेल्या या सुंदोपसुंदीवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. आपल्याला एखाद्याचं म्हणणं पटू शकत नाही, पण लोकशाहीत व्यक्त होण्याचा आणि आपलं मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. वाद-प्रतिवाद होत रहावेत, पण पोस्टरला चपलांनी मारण हे पातळी घसरल्याचं लक्षण असल्याचं अमृता फडणवीसांनी म्हटलं होतं.

हरामखोर बाबत काय म्हणाले संजय राऊत?

एखाद्या विषयाचं राजकारण करायचं असेल तर कुठल्याही शब्दाचा कुठलाही अर्थ निघू शकतो. महाराष्ट्रात आम्ही जेव्हा हरामखोर असं म्हणतो तेव्हा आम्ही त्याचा अर्थ खट्याळ आणि बेईमान असा होता. जी व्यक्त मुंबईत राहतो त्याबद्दल कुणी काही बोललं तर लोक असं म्हणतात त्याचा फार वेगळा अर्थ काढायची गरज नाही. जर कंगना रणौत कोलकाता, अहमदाबाद किंवा इतर कोणत्याही शहराबाबत असं बोलली असती तर त्या शहरांमधले लोक त्यांच्या भाषेत कंगनाला बोललेच असते तसंच मी बोललो असंही संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 8:52 am

Web Title: former cm devendra fadnavis wife amruta fadnavis criticize shiv sena leader mp sanjay raut kangana ranaut pok mumbai naughty haramkhor statement jud 87
Next Stories
1 एकनाथ खडसे यांनी सोडलं मौन, थेट देवेंद्र फडणवीसांनाच केला सवाल; म्हणाले…
2 एकदाच धूर निघाला पाहिजे… हर हर महादेव; नितेश राणे भडकले
3 केला इशारा जाता जाता असे समजून त्याकडे दुर्लक्ष करू नये -शिवसेना
Just Now!
X