News Flash

वाढदिवसाची पार्टी करुन परतताना भीषण अपघात, डोळ्यांदेखत चार मित्रांचा मृत्यू

ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत कारचा अक्षरश: चेंदामेंदा

चंद्रपुरात कारचा भीषण अपघात झाला आहे. ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला असून चौघांचा मृत्यू झाला आहे. वाढदिवसाची पार्टी करुन मित्र परततत असताना हा अपघात झाला. अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. ज्या तरुणाचा वाढदिवस होता तो वाचला असून आपल्या मित्रांचा मृत्यू पाहण्याची दुर्दैवी वेळ त्याच्यावर आली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.

चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर भागात मंगळवारी रात्री हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन तरुण आणि दोन तरुणींचा समावेश आहे. हे सर्वजण मूल येथील प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबातील असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योग गोगरी (२३) याचा मंगळवारी वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी दर्शना उधवाणी ( २५), प्रगती निमगडे (२४), मोहम्मद अमन (२३) आणि स्मित पटेल (२५) या चार मित्रांसह योग गोगरी हॉटेलमध्ये गेला होता. वाढदिवस साजरा करुन घऱी परतत असतानाच अजयपूर येथे त्यांचा कारचा भीषण अपघात झाला.

ट्रॅक्टर अचानक शेतातून मुख्य मार्गावर अल्याने भरधाव वेगात असलेली कार ट्रॅक्टरवर आदळली आणि हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. अपघातानंतर तेथील स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मुलांना बाहेर काढलं. मात्र यामधील चौघांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावावर शोककळा पसरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 10:31 am

Web Title: four died in car accident chandrapur sgy 87
Next Stories
1 “अजित पवार तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये रडता, मोबाईल बंद करून लपून बसता”
2 चंद्रकांत पाटलांविरोधात भाजपात बंड, राजीनाम्याची मागणी
3 मुंबई-पुणे एक्सप्रेस वे : “६ किमी अंतर कमी करण्यासाठी ६६०० कोटी रुपये खर्च करायची काय गरज होती?”
Just Now!
X